विभागातील उत्कृष्ट खेळाडू

कोल्हापूर विभागाने अनेक उत्कृष्ट खेळाडू तयार केले आहेत ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. खालील काही प्रमुख खेळाडूंची माहिती

1 स्वप्नील कुसाळे (नेमबाजी): स्वप्नील कुसाळे हे कोल्हापूरचे नेमबाज आहेत. त्यांनी पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स इव्हेंटमध्ये कांस्य पदक जिंकले, ज्यामुळे या इव्हेंटमध्ये पदक जिंकणारे ते पहिले भारतीय नेमबाज ठरले.
2 अनिकेत जाधव (फुटबॉल): अनिकेत जाधव हा कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू आहे. तो भारताच्या अंडर-१७ विश्वचषक संघाचा भाग होता आणि सध्या इंडियन सुपर लीगमधील ओडिशा एफसीसाठी खेळतो.
3 समर्थ म्हकवे (कुस्ती): समर्थ म्हकवे हा कोल्हापूरचा कुस्तीपटू असून त्याने जॉर्डनमध्ये झालेल्या कॅडेट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
4 तेजस्विनी सावंत (नेमबाजी): तेजस्विनी सावंत या कोल्हापूरच्या नेमबाज असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या आहेत.
5 राही सरनोबत (नेमबाजी): राही सरनोबत या कोल्हापूरच्या आणखी एक प्रसिद्ध नेमबाज आहेत. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले असून, ऑलिंपिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
6 वीरधवल खाडे (जलतरण): वीरधवल खाडे हा कोल्हापूरचा जलतरणपटू असून, ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेता आहे.
7 मुरलीकांत पेटकर (पॅरालिम्पिक जलतरणपटू): मुरलीकांत पेटकर हे सांगलीतील पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. १९७२ च्या हायडेलबर्ग पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरणात सुवर्णपदक जिंकले आणि ३७.३३ सेकंदांचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
8 सचिन खिलारी (पॅरा एथलेटिक्स ): सचिन खिलारी हे सांगली जिल्ह्यातील करगणी गावचे पॅरा-अॅथलीट आहेत. त्यांनी आशियाई पॅरा गेम्समध्ये गोळाफेक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि स्पर्धेचा विक्रम मोडला.
9 दीपक सरगर (पॅरा टेबल टेनिस): दीपक सरगर हे सांगलीतील पॅरा टेबल टेनिस खेळाडू आहेत. मस्क्युलर डिस्ट्रॉफी असूनही, त्यांनी टेबल टेनिस खेळणे सुरू ठेवले आणि खेळाच्या माध्यमातून आनंद आणि सामर्थ्य मिळवले.
10 चंद्रहार पाटील (कुस्ती): चंद्रहार पाटील यांनी २००७ आणि २००८ मध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. त्यांचे कुस्ती क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे.
11 वैष्णवी बाजरंग पोवार (खो-खो): वैष्णवी पोवार या इचलकरंजीतील चंदूर-शाहूनगर गावातील रहिवासी आहेत. जानेवारी २०२५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा भाग म्हणून त्यांनी सहभाग घेतला आणि संघाने नेपाळविरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवून विश्वचषक जिंकला.
12 आदिती स्वामी (तिरंदाजी): आदिती ही अत्यंत कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.जागतिक करंडक स्पर्धेत 2006 नंतर सुवर्णपदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली होती. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720 पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

क्रीडा संकुल